अयोध्या निर्णयावर बॉलिवूडकरांनी दिल्या या प्रतिक्रिया

अयोध्येतील राम मंदिर-बाबरी मस्जिद वादावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. वादग्रस्त जमीन राम मंदिरासाठी व मशिदीसाठी अयोध्येतच पर्यायी जागा देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे बॉलिवूडकरांनी देखील स्वागत केले आहे. सर्वांनी शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

या प्रकरणावर बॉलिवूडकरांनी दिलेल्या प्रतिक्रिया जाणून घेऊया –

अभिनेता फरहान अख्तरने ट्विट केले की, “सर्वांना विनंती आहे, आज येणाऱ्या निर्णयाचा सर्वांनी सन्मान करावा. हा निर्णय तुमच्या बाजूने असो किंवा नसो तरीही त्याचा स्वीकार करा. कारण आपल्या देशाला या सर्वातून वर येण्याची गरज आहे, जय हिंद.”

“माझ्या प्रिय भारतीयांनो सर्वांना विनंती आहे, की सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करा. आपल्या सर्वांना एकत्र येऊन देशाला पुढे नेण्याची गरज आहे”, असे ट्विट अभिनेत्री हुमा कुरेशीने केले आहे.

लेखक चेतन भगतने या निर्णयावर ट्विट केले की, “जे काही होईल, शांती भंग देवाची करण्याची कधीही इच्छा नसते. याला अशाच प्रकारे ठेवा.

विविध राजकीय विषयांवर भाष्य करणारे अनुपम खेर यांनी ट्विट केले की, अल्लाह तेरो नाम, ईश्वर तेरो नाम। सबको सम्मति दे भगवान।

अभिनेत्री तापसी पन्नूने ट्विट केले की, झाले सर्व आता पुढे ? तिने आणखी ट्विट केले की, पुढे जाऊन आपला देश राहण्यासाठी कशाप्रकारे उत्तम बनवता येईल, यासाठी काम करू.

अभिनेता विवेक ओबेरॉयने देखील महात्मा गांधीजींचा फोटो शेअर करत शांतीचे श्रेय त्यांना दिले.

आणखी काही ट्विट –

Leave a Comment