मोदींपासून ते राज ठाकरेंपर्यंत अयोध्या निर्णयावर नेत्यांनी दिल्या या प्रतिक्रिया

राम मंदिर-बाबरी मशिद प्रकरणात सर्वोच्च न्यायलयाचे 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. वादग्रस्त जागा राम मंदिरासाठी व मशिदीसाठी पर्यायी जागा देण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, न्यायालयाने आपला निर्णय दिला असून, या निर्णयाकडे कोणाचा विजय अथवा पराभव या दृष्टीने बघितले नाही पाहिजे. तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, रामभक्ती असो अथवा रहीमभक्ती. ही वेळ आपल्याला भारतभक्तीची भावना सशक्त करण्याची आहे. शांती, सद्भावना आणि एकता कायम ठेवा.

गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, मी सर्व समुदाय आणि धर्माच्या लोकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्विकार करण्याचे आणि शांती कायम ठेवून एक भारत श्रेष्ठ भारताच्या प्रती एकनिष्ठ राहण्याचे आवाहन करतो.

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, जो पर्यंत हे जग आहे, तोपर्यंत आम्ही या देशाचेच नागरिक असू. आम्ही भलेही नसू, मात्र येणाऱ्या पिढ्यांना सांगू की, ज्या जागेवर 500 वर्ष मशिद होती, त्याला 6 डिसेंबर 1992 ला संघ परिवाराने पाडले आणि सर्वोच्च न्यायालयाला चुकीची माहिती दिली. मशिद हा काही जमिनीचा व्यवहार नाही. मी माझ्या घराचा व्यवहार करतो, मात्र मशिदच्या जमिनीचा व्यवहार केला जाऊ शकत नाही.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, हा ऐतिहासिक निर्णय आहे. मी नागरिकांना आवाहन करतो की, शांती कायम ठेवा.

भाजप नेत्या उमा भारती म्हणाल्या की, न्यायालयाने निष्पक्ष निर्णय दिला आहे. मी आडवाणी यांच्या घरी त्यांच्या पाया पडायला जाईल. आडवाणी हे तेच व्यक्ती आहेत, ज्यांनी छद्म-धर्मनिरपेक्षतेला आव्हान दिले.

रामदेव बाबा यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.

याशिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी देखील न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत शांती कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आजचा दिवस आनंदाचा असून, कारसेवकांचे बलिदान सार्थक झाल्याचे म्हटले.

अन्य काही प्रतिक्रिया –

Leave a Comment