जाणून घेऊया ट्विटरचा पर्याय Mastodon काय आहे ?

भारतात सध्या मास्टोडॉनचे (Mastodon) नावाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील संजय हेगडे यांना ट्विटरवर बॅन करण्यात आल्यानंतर अनेकजण मास्टोडॉनकडे वळत आहेत. मास्टोडॉनला ट्विटरचा पर्याय असल्याचे देखील म्हटले जात आहे. मास्टोडॉन दिसायला आणि वापरण्यास देखील ट्विटर सारखेच आहे. मात्र हे एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे याला कोणत्याही एका कंपनी आणि सर्व्हर हँडल केले जात नाही. ज्यामुळे याच्या प्राव्हेसीचा धोका आहे.

काय आहे Mastodon ?

मास्टोडॉन देखील एक सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर मेसेज, व्हिडीओ आणि फोटो शेअर केले जातात. 2016 मध्ये हे प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आले होते. मास्टोडॉनची संख्या सध्या 22 लाख असून, ती वाढतच चालली आहे. हा सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म बनविण्याचे श्रेय 26 वर्षीय जर्मन सॉफ्टवेअर डेव्हलपर Eugen Rochko ला दिले जाते.

ट्विटरवर सध्या पक्षपातीपणाचे आरोप करण्यात येत आहे. ट्विटर ठराविक लोकांचेच अकाउंट बॅन करत असून, ट्विट देखील डिलीट करण्यात येत आहे. यामुळे बॉयकॉट ट्विटर देखील ट्रेंड होत होते.

या प्रकरणावर ट्विटरने देखील स्पष्टीकरण देत आम्ही निष्पपाती असून, कोणत्याही विचारधारा आणि राजकीय दृष्टीकोणाच्या आधारावर कारवाई करत नाही, असे म्हटले आहे.

 

Leave a Comment