सॅमसंगसह ‘या’ स्मार्ट टीव्हीवर 1 डिसेंबर पासून दिसणार नाही नेटफ्लिक्स


आता येत्या काळात काही टीव्हींना जगप्रसिद्ध ऑनलाईन स्ट्रिमिंग सर्व्हिस नेटफ्लिक्स हे सपोर्ट करणार नाही. त्यामध्ये सॅमसंगसह अन्य काही स्मार्ट टीव्ही यांचा समावेश आहे. नेटफ्लिक्स या वर्षाच्या शेवटच्या महिन्यापासून स्मार्ट टीव्हीमध्ये काम करणे बंद करणार आहे. सॅमसंग आणि Roku यांचा त्यामध्ये सहभागी आहेत. 1 डिसेंबर पासून या टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स सपोर्ट करणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.

या प्रकरणी स्पष्टीकरण सॅमसंगने देत असे म्हटले आहे की, हा निर्णय टेक्निकल लिमिटेशनमुळे घेण्यात आला आहे. सॅमसंगच्या सपोर्ट पेजवर असे म्हटले आहे की, 1 डिसेंबर 2019 पासून जुन्या सॅमसंग स्मार्ट टीव्हीमध्ये टेक्निकल सपोर्टच्या कारणामुळेच नेटफ्लिक्स काम करणार नाही. नेटफ्लिक्स भविष्यात दुसऱ्या योग्य डिवाइसवर सुरु राहणार आहे. कंपनीने फोरमवर असे लिहिले आहे की, नेटफ्लिक्सचे सपोर्ट 2010 आणि 2011 च्या मॉडेल जे C आणि D पासून सुरु होतात त्यांना मिळणार नाही आहे. त्याचसोबत काही डिवाइस असे ही आहेत जे टीव्ही-टीव्ही सोबत जोडलेले असतात. त्यांना मात्र नेटफ्लिक्सचे सपोर्ट मिळणार आहे. जर जुन्या मॉडेलचा टीव्ही तुमच्याकडे असल्यास त्याचा मॉडेल क्रमांक तपासून पाहण्यासाठी त्याच्या मागील बाजूस देण्यात आलेल्या पॅनलवरील माहिती तपासून घ्यावी.

तसेच नेटफ्लिक्स रोकू Roku 2000C, Roku 2050X, Roku 2100X, Roku HD, RokuSD, Roku XD आणि RokuXR मध्ये सपोर्ट करणे बंद करणार आहे. नेटफ्लिक्स ज्या कंपनीच्या स्मार्ट टीव्हीमध्ये चालणार नाही त्याबाबतची अधिक माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर दिली जाणार आहे. पण 2011 नंतर असलेल्या सॅमसंग मॉडेलच्या स्मार्ट टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स सपोर्ट मिळणार आहे. तुमच्या टीव्हीमध्ये सुद्धा जर सपोर्ट देण्यात येत नसल्यास अॅमेझॉन फायर स्टिक तुम्ही खरेदी करु शकता. ते तुम्ही टीव्ही मध्ये कनेक्ट केल्यास नेटफ्लिक्स पाहू शकता.

Leave a Comment