छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखाबद्दल ‘सोनी वाहिनी’ची जाहीर माफी


छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये एकेरी उल्लेख केल्यामुळे संतापाची लाट उसळल्यानंतर ‘सोनी वाहिनी’ने सपशेल माफी मागितली आहे. या शोमधील स्पर्धकाला प्रश्न विचारताना ऑप्शनमध्ये शिवरायांचा ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केल्यामुळे सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती.


छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘केबीसी’तील बुधवारच्या भागात दुर्लक्षातून चुकीचा संदर्भ दिला गेला. या गोष्टीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेत आम्ही कालच्या भागात खेद व्यक्त करण्यासाठी एक स्क्रोल चालवला असल्याचे ट्विट सोनी वाहिनीच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊण्टवरुन करण्यात आले आहे.

स्क्रोल चालवल्याचा व्हिडीओही या ट्विटसोबत शूट करुन पोस्ट करण्यात आला आहे. तर केबीसीचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनाही टॅग करण्यात आले आहे. शिवरायांच्या एकेरी उल्लेखाबद्दल चाहत्यांनी अमिताभ बच्चन यांच्याही माफीची मागणी केल्यामुळे बिग बी आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Leave a Comment