या युनिवर्सिटीत पार्किंगसाठी पैशांच्या जागी स्विकारण्यात येत आहे सॅन्डविच

तुम्हाला गाडी पार्किंगसाठी पैशांऐवजी कोणी सॅन्डविच अथवा पिनट बटर मागितले तर ? ही नक्कीच एक चांगली ऑफर असेल. अमेरिकेतील युनिवर्सिटी ऑफ अलास्कामधील विद्यार्थ्यांना चक्क अशीच ऑफर देण्यात आली आहे.

युनिवर्सिटीच्या एनचॉर्ज कॅम्पसमध्ये जर कोणी पार्किंगचे पैसे दिले नसतील किंवा पार्किंगचे पैसे कमी करायचे असतील तर त्या बदल्यात पिनट बटर आणि जेली देऊ शकतात.

गरजू व उपाशी विद्यार्थ्यांसाठी युनिवर्सिटी वार्षिक डोनेशन घेत आहे. पार्किंगच्या पैशांऐवजी देण्यात येणारे पिनट बटर आणि जेली गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, 454 ग्रॅम जारसाठी (डब्बा) 10 डॉलर क्रेडिट मिळेल. तीन जारसाठी 35 डॉलर आणि 5 डॉलरसाठी 60 डॉलर क्रेडिट मिळतील. यासाठी न उघडलेल्या नट बटर – बदाम, काजू, पिनट बटर, जॅम, जेरी यासारख्या गोष्टी स्विकारल्या जातील.

Leave a Comment