शरीराला जीवनसत्व देणारे अंडे घेऊ शकते तुमचाही जीव, त्यामुळे अशा घ्या काळजी!


आपल्याकडे संडे हो या मंडे, रोज खाएं अंडे अशा आशयाचे एक वाक्य प्रचलित आहे. अंड्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते हे जरी सत्य असले तरी अंडे खाताना थोडी काळजी घेतलेली बरी असते, नाही तर अंडी खाणे तुमच्या जीवावर बेतू शकते. त्यासाठी काय काळजी घ्यावी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

शरीरातील जीवनसत्वांची पुर्तता अंडी करते. अंडे खाल्ल्यानंतर त्यातील जीवनसत्वांचे रुपांतर एल्बुमिनमध्ये होते. त्यामुळे शरीरातील अनेक गरजा पूर्ण होतात. सर्वसाधारणपणे दोन अंडी खाणे हे आपल्या आरोग्यासाठी फलदायी आहे. पण त्यापेक्षा जास्त अंडी खायची असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवर्जुन घेतला पाहिजे.

बॉडी बिल्डिंग जे लोक करताता त्यांना जीवनसत्वांची जास्त गरज असते. पण त्याची इतरांसाठी वेगळी गरज असल्यामुळे दोनपेक्षा जास्त अंडी खाल्ल्यामुळे सामान्य माणसाला अपाय होऊ शकतो. पोट बिघडणे, अ‍ॅसिडीटी त्याचबरोबर दीर्घकाळासाठी किडनीही खराब होऊ शकते कारण जास्त प्रोटीन पचविण्यासाठी त्याला जास्त काम करावे लागते.

नुकताच उत्तर प्रदेशात एका तरुणाचा जास्त अंडी खाल्ल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे किती अंडी खावी आणि किती अंडी खावू नये यावर सध्या देशभर चर्चा सुरू झाली आहे. हिवाळ्यात अंडी भरपूर जीवनसत्वे असल्यामुळे खाल्ली जातात. 9 प्रकारचे अमीनो अ‍ॅसिड त्यात असतात. त्याचबरोबर ओमेगा 3 ही असते. दररोज दोन अंडी खाणे हे बुद्धिलाही फायदेशीर असून त्यामुळे बुद्धीचा तल्लखपणा वाढतो आणि तरतरीतही वाटते.

अंडी खाणे फायद्याचे असल्याचे जगभरात झालेल्या संशोधनामध्येही आढळून आले आहे. अंडी खाण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. अंडी ही स्वस्त आणि मिळायला सोपी असल्यामुळे ती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. त्यामुळे ते गरीबांसाठीही चांगले खाद्य आहे. पण कुठलीही गोष्ट चांगली असली की तिचा अतिरेक करू नये. त्याचे प्रमाण योग्य असले तरच ते फायद्याचे असते. अंड्यांच्याबाबतीतही तेच खरे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
https://thestayathomechef.com/wp-content/uploads/2014/11/How-To-Poach-Eggs-3.jpg
अंड्यांचा पांढरा भाग फॅट आणि कोलेस्टेरॉल-फ्री असतो. 100 ग्रॅम अंड्याच्या पिवळ्या भागात 16 तर पांढऱ्या भागात 11 ग्रॅम जीवनसत्व असते. प्रोटीनमुळे प्रकृती चांगली तर राहतेच त्याचबरोबर डोळे, नखे आणि कासांसाठीसुद्धा अंडे उत्तम आहार आहे. त्याचे प्रमाण फक्त योग्य असावे लागते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही