या केकच्या किंमतीत खरेदी करू शकता एक घर

वरील फोटो बघून जर तुम्हाला वाटत असेल की, या मुलीने घातलेला गाउन विक्रीसाठी आहे. तर तसे नाहीये. हा जगातील सर्वात महागडा केक आहे. या केकची किंमत 1 कोटींपेक्षा अधिक असून, याला बनविण्यासाठी तब्बल 10 दिवस लागले आहेत.

या केकचे डिझाईन ब्रिटनची सेलिब्रेटी केक डिझाईनर डॅबी विंघेम्सने केले आहे. हा केक बनविण्यासाठी 1000 हजार खरे मोती, 5000 फूल, 1000 अंडी, 25 किलो चॉकलेटचा वापर करण्यात आला आहे. या केकचे वजन 100 किलो आहे.

आजपर्यंत यापेक्षा महागडा केक कोणीच तयार केलेला नाही. डॅबीच्याच नावावर हा रेकॉर्ड आहे. डॅबीची केक बनविण्याची स्टाईल देखील वेगळी आहे. ती खुर्ची, सोफा, भांडी या आकाराचे केक बनवते.

तिचे हे केक एवढे महाग आहेत की, केकचा एक घास खाण्यासाठी लोन देखील घ्यायला लागू शकते.

 

Leave a Comment