हे करून पहा; कधीच रूसणार नाही तुमची बायको !


तुम्ही घराबाहेर दुनियेचा बॉस असाल पण घरी मात्र बायकोच बॉस असते. हे अनेकांना कदाचीत पटणार नाही, पण अनेकांच्या बाबतीत हे खोटेही नाही. अनेकदा तुम्ही अनेक गोष्टी सांभाळू शकता. पण, बायकोचा मूड? सांभाळणे शक्य नाही. पण हे खरे आहे. बायकोचा मूड सांभाळणे ही बाब वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. बायकोचा मूड सांभाळणे ज्या पुरूषाला चांगले जमले त्याच्या आनंदाला पारावार नाही. पण बायकोचा मूड ज्याला सांभाळता आला नाही त्याच्या दु:खाला अंत नाही. म्हणूनच हे करून पहा ज्यामुळे तुम्हाला बायकोला खूश ठेवण्याचा फंडा सापडेल.

बायकोला प्रत्येक वेळी खूप मोठ्या गोष्टी हव्या असतात असे मुळीच नाही. अनेकदा तुमची बायको खूप छोट्या गोष्टींनीही खूश होऊ शकते. जसे की तिला एखाद्या कामात मदत करणे. उदा. तुम्ही पाचव्या मजल्यावर राहात असाल. तुमची बायको स्वयंपाक करत असेल आणि घरातील दूध संपले आहे. अशा वेळी तुम्ही जर खाली जाऊन दूध घेऊन आलात तर ती प्रचंड आनंद होईल.

बायको प्रत्येक वेळी खूप महागड्या साड्या, कपडे, ज्वेलरी, मोबाईल, टूर किंवा असेच काहीतरी खरेदी करून किंवा गिफ्ट देऊन खूश होते असेही नाही. तुम्ही ऑफिसवरून घरी जातान अगदी आठवणीने छोटासा गजरा जरी घेऊन गेलात तरीही ती खूश होते.

आपल्या नवऱ्याने आपल्याला वेळ दिला पाहिजे अशी प्रत्येक बायकोची अपेक्षा असते. नेमकी येथेच अनेकांच्या बाबतीत गोची होते. ऑफीस, व्यवसाय, घर-घराबाहेरचा ताण, जबाबदारी या सर्वांमध्ये तिला वेळ द्यायला जमेलच असे नाही. पण, प्रत्येकाने स्वत:साठी म्हणून काही वेळ काढायला हवा आणि त्यात बायकोला सहभागी करून घ्यायला हवे.

बायकोचे जमेल तसे कौतूक करण्याचा प्रयत्न करा. बायकोचे कौतूक करून तुम्ही तिचे मन वळवण्यात यशस्वी झालात की, समजून जा ती तुमच्या मनासारखेच वागेन. तिचा मूड खराब होईल असे शक्यतो वागू नका. कोणतीही पत्नी आपल्या नवऱ्याने केलेले कौतूक ऐकून फार खूश होत असते. (नवऱ्याने केलेले कौतून म्हणजे तिचे कौतूक करा. नाहीतर दुसऱ्याच्या बायकोचे कौतूक तिच्यासमोर कराल. लक्षात ठेवा तुम्ही चुकून जरी असे केलेत तर, तुम्हाला मिळणारी शिक्षा फार भयानक असेल.) तुम्ही केलेल्या कौतूकासमोर बायको तुमच्या चुकांकडेही दुर्लक्ष करते. संसारात आनंद हवा असेल तर, तिच्या माहेरच्या मंडळींवर टीका करणे टाळा. कारण, माहेरच्या मंडळींबाबत तिला विशेष प्रेम असते. अगदी तिकडची मंडळी कशीही असली तरी.

Leave a Comment