18 वर्षांनी लहान असलेल्या युवतीबरोबर तिसऱ्यांदा विवाहबद्ध झाला 45 वर्षाचा भाजप नेता


गुजरात -: सध्या विधानसभेसाठी कोण सत्ता स्थापन करणार यावरून महाराष्ट्रात वाद सुरू असून कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे सगळ्या मोठा पक्ष म्हणून भाजप आणि दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेत सत्ता संघर्ष सुरू आहे. या सगळ्या दरम्यान, एक अजब प्रकार गुजरातमध्ये समोर आला आहे. गुजरातच्या एका 42 वर्षाचा भाजप नेता तिसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे. या नेत्याच्या तिसऱ्या विवाहाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

दाहोद जिल्ह्याच्या ईकाईचे भाजप नेता शंकरभाई अमलियार अध्यक्ष आहेत. नुकताच जिल्ह्यातील महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष महिलेसोबत त्यांनी विवाह केला आहे. सध्या सगळीकडे त्यांच्या या लग्नाची चर्चा सुरू आहे. दाहोद जिल्ह्यातील फतेपुरा तालुक्यातील सिगडापाडा गावाचे निवासी असलेले शंकरभाई अमलियार हे सध्या जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष आहेत. शंकरभाई यांचा पहिला विवाह फतेपुराचे खासदार रमेश कटारा यांच्या बहिणीसोबत झाला. पहिल्या पत्नीपासून त्यांना 4 मुले आहेत.

2010 मध्ये शंकर यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर शंकरभाई यांनी 2011मध्ये जलोडेच्या ज्योत्सनाबेन यांच्याशी दुसरा विवाह केला. पण त्यांच्या घरातील वाद दुसऱ्या लग्नानंतर वाढत गेला. शंकरभाई आणि ज्योत्सनाबेन यांनी घरातील भांडणांमुळे एका वर्षात वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर शंकरभाई यांनी 20 जूनला तिसरा विवाह केला. त्यांनी आपल्या वयाच्या 18 वर्ष लहान युवतीसोबत लग्न केल्यामुळे ते सध्या चर्चेचा विषय आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 27 वर्षांच्या जल्पाबेन यांच्याशी त्यांनी विवाह केला. जल्पाबेन यासुद्धा भाजप कार्यकर्ता आहे. जल्पाबेन या सध्या जिल्ह्याच्या महिला मोर्चा संघाच्या उपाध्यक्ष आहेत. तर दाहोदमध्ये एमएससीच्या दुसऱ्या वर्षाच त्या अभ्यास करत आहेत. ते त्यांच्या या विवाहानंतर सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

Leave a Comment