अ‍ॅपलला मात देण्यासाठी शाओमीने लाँच केले पहिले-वहिले स्मार्टवॉच

शाओमीने आपले पहिले स्मार्टवॉच एमआय वॉच (Mi Watch) लाँच केले आहे. या स्मार्टवॉचमध्ये एमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून, दिसायला हे अपल वॉच प्रमाणेच आहे. कंपनीनुसार, हे वॉच 44एमएम डायलसोबत येईल. यामध्ये मॅट फिनिशिंगसोबत एल्युमिनियम एलॉय फ्रेम मिळेल.

स्मार्टवॉचमध्ये सेरामिक बँक कव्हर, कर्व्ड गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन आणि रबर स्ट्रेप आहे. किंमतीबद्दल सांगायचे तर एमआय वॉचची किंमत 1200 युआन (जवळपास 13000 रूपये) आहे. तर या स्मार्टवॉचच्या प्रिमियम व्हेरिएंटची किंमत 1,999 युआन (जवळपास 20,000 रूपये) आहे. चीनमध्ये याच महिन्यात या वॉचची विक्री सुरू होईल. हे वॉच सिल्वर आणि ब्लॅक रंगात मिळेल.

(Source)

एमआय वॉचमध्ये 1.78 इंच एमोलेड स्क्रीन (368×448 पिक्सल) आहे. पिक्सल डेनसिटी 326 पीपीआय आहे. यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन विअर 3100 प्रोसेसर आहे आणि हे ड्युल सिम (ई-सिम) सेल्युलर कनेक्टिविटीसोबत येईल. यात वाय-फाय, ब्लूटूथ, एनएफसी सपोर्ट आणि 570 एमएएच बॅटरी देखील मिळेल. कंपनीने दावा केला आहे की, बॅटरी एकदा चार्ज केल्यावर 35 तास चालेल

.

(Source)

शाओमीने आपल्या स्मार्टवॉचमध्ये एमआययूआय ऑपरेटिंग सिस्टमचे MIUI for Watch व्हर्जन वापरले आहे. यामध्ये गुगलच्या विअर ओएसचे अनेक फीचर्स आहेत. कंपनीने स्मार्ट होम डिव्हाईस कंट्रोल करण्यासाठी देखील स्वतःचे व्हॉइस असिस्टेंट दिले आहे.

फिटनेस आणि हेल्थ ट्रॅकिंगबद्दल सांगायचे तर यात स्लीप ट्रॅकिंग, स्ट्रेस ट्रॅकिंग, बॉडी एनर्जी ट्रॅकिंग आणि 10 प्रोफेशनल स्पोर्टस मोड दिले आहेत. याशिवाय हे वॉटर आणि स्विमिंग प्रुफ असून, यात 1 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे.

 

Leave a Comment