191 कोटीच्या नव्या विमानातून प्रवास करणार गुजरातचे मुख्यमंत्री


अहमदाबाद – चक्क 191 कोटी रुपयांचे नवीन विमान भाजपच्या नेतृत्वातील गुजरात सरकारने विकत घेतले आहे. केवळ गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि अति महत्वाच्या (व्हीआयपी) व्यक्तींच्या प्रवासासाठी हे विमान वापरले जाणार आहे. अखेर बुधवारी गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या या नवीन विमान योजनेची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन आठवड्यात ‘बम्बार्डिअर चॅलेंजर 650’ नावाचे हे विमान गुजरात सरकारच्या स्वाधीन केले जाणार आहे.

12 जण गुजरात सरकारने विकत घेतलेल्या नवीन विमानात प्रवास करू शकतात. हे विमान एकाचवेळी उड्डाण भरल्यास सलग 7000 किमी पर्यंत नेता येईल. गुजरात सरकारच्या मुख्यमंत्री आणि व्हीआयपींना गेल्या 20 वर्षांपासून ‘बीचक्राफ्ट सुपर किंग’ विमानात प्रवास घडवला जात असे. आता त्याचीच जागा नवीन विमान घेत आहे.’बम्बार्डिअर चॅलेंजर 650′ जुन्या विमानाच्या तुलनेत अधिक सक्षम आणि आधुनिक आहे. याचा ताशी स्पीड 570 किमी राहील. हे विमान विकत घेण्यासाठी सरकारी तिजोरीवर 191 कोटी रुपयांचा भार पडला आहे. विमान गुजरातमध्ये आणण्यासाठी सर्वच औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्या असून याच महिन्यात डिलिव्हरी मिळेल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment