फेसबुकच्या नव्या लोगोची ट्विटरच्या सीईओंनी उडवली खिल्ली


अद्यापही सोशल मीडियातील दोन दिग्गज कंपन्या फेसबुक आणि ट्विटर यांच्यातील स्पर्धा कायम असल्याचा प्रत्यय नुकताच आला आहे. आपला नवा लोगो नुकताच फेसबुकने लाँच केला आहे. वेगवेगळ्या रंगात हा लोगो असून फेसबुकच्या इतर प्रोडक्टला हे रंग दर्शवतात. हा लोगो फेसबुकची मालकी असलेल्या इतर कंपन्या आणि फेसबुक कंपनी यामध्ये वेगळेपण रहावे, यासाठी लाँच करण्यात आला आहे. पण, काही नेटकऱ्यांच्या पसंतीस हा लोगो पडलेला नाही. परिणामी काही नेटकऱ्यांकडून लाँच झाल्यापासूनच या लोगोची खिल्ली उडवली जात आहे. ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी देखील फेसबुकच्या नव्या लोगोची खिल्ली उडवण्यात मागे नाहीत. आपल्या स्पर्धक कंपनीवर निशाणा साधण्याची ही संधी त्यांनीही सोडलेली नाही.


एक ट्विट करुन फेसबुकच्या नव्या लोगोची जॅक डॉर्सी यांनी खिल्ली उडवली आहे. केवळ तीन शब्द या ट्विटमध्ये लिहिले आहेत. डॉर्सी यांनी ‘Twitter from TWITTER’ या तीन शब्दांमध्येच ट्विट केले आहे. प्रथमदर्शनी हे ट्विट फेसबुकच्या नव्या कॅपिटल अक्षरांच्या लोगोची खिल्ली उडवणारे वाटते. पण, डॉर्सी यांनी यासोबतच इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर दिसणाऱ्या ‘from Facebook’या नावाचीही टर उडवली आहे. नवा लोगो लाँच करतेवेळी, वेगळेपण राहावे यासाठी फेसबुकशिवाय इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअॅपसारख्या कंपनीच्या इतर सेवांमध्ये ‘from Facebook’ हे नाव दिसेल असे फेसबुकने स्पष्ट केले होते. आपल्या ट्विटमध्ये याचीही डॉर्सी यांनी खिल्ली उडवली आहे.

Leave a Comment