8 नोव्हेंबरला दुसऱ्यांदा होणार अंडरवॉटर न्यूक्लियर मिसाइलचे परीक्षण


हैदराबाद- 8 नोव्हेंबरला आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टनमच्या किनाऱ्यावर डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन(डीआरडीओ) के-4 न्यूक्लियर मिसाइलचे परीक्षण करणार आहे. पाण्याच्या आत बनलेल्या प्लॅटफॉर्मवरुन हे परीक्षण केले जाईल. 3500 किमीलोमीटर दुरवरील शत्रुला मारण्याची या मिसाइलची क्षमता आहे. ही भारताचे हे दुसरे अंडरवॉटर मिसाइल आहे. यापुर्वी 700 किलोमीटर मारक-क्षमता असलेले बीओ-5 मिसाइल भारताने बनवले आहे.

के-4 देशातील दुसरे अंडरवॉटर मिसाइल आहे. याआधी 700 किमी मारक-क्षमता असलेले बीओ-5 मिसाइल तयार केले आहे. सरकारी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील महिन्यातच के-4 चे परीक्षण करणार होते, पण काही तांत्रिक कारणास्तव ते रद्द करण्यात आले होते. पुढील काही दिवसात डीआरडीओ अग्नि-3 आणि ब्रम्होस मिसाइलचे परीक्षण करणार आहे.

देशात बनलेली पहिली न्यूक्लियर आर्म्ड सबमरीन आयएनएस अरिहंतला ऑगस्ट 2016 मध्ये नौदलात सामील करण्यात आले होते. न्यूक्लियर आर्म्ड सबमरीन असलेला भारत जगातील सहावा देश आहे. भारताशिवाय अमेरिका, ब्रिटेन, फ्रांस, रशिया आणि चीनकडे अशा सबमरीन आहेत.

Leave a Comment