फेसबुकने लाँच केला आपला नवा लोगो


सॅन फ्रान्सिस्को – नुकताच आपला नवा लोगो सोशल मीडिया जगतात प्रसिद्ध असलेली कंपनी ‘फेसबुक’ने लाँच केला. हा नवीन लोगो फेसबुकची मालकी असलेल्या इतर कंपन्या आणि फेसबुक कंपनी यामध्ये वेगळेपण रहावे, यासाठी लाँच करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

सध्या फेसबुक, इंस्टाग्राम असे सोशल मीडिया अॅप्स तर व्हॉट्सअॅप, फेसबुक मेसेंजर हे मेसेजिंग अॅप्स ‘फेसबुक’ चालवते. त्याचबरोबर फेसबुक ऑक्युलस, वर्कप्लेस, पोर्टल आणि कॅलिब्रा (‘लिब्रा’ ही डिजिटल करन्सी) अशा अनेक सुविधा देखील पुरवते. ‘फेसबुक अॅप’चाच लोगो यासाठी आतापर्यंत फेसबुक कंपनीसाठी वापरला जात होता. पण आतापासून फेसबुक कंपनी आपला नवा लोगो वापरेल, तर फेसबुक अॅपसाठी जुना लोगो हा कायम राहील. विशिष्ट प्रकारचा फॉन्ट या लोगोसाठी वापरण्यात आला आहे, तर हा फेसबुक अॅपच्या लोगोप्रमाणे ‘स्मॉल’ नव्हे, तर ‘कॅपिटल’ लेटर्समध्ये दिसून येतो.

फेसबुक कंपनी आणि फेसबुक अॅप यामध्ये या नव्या अॅपमुळे फरक दिसून येईल. तसेच, यासाठी फेसबुकच्या नवीन लोगोसह, कंपनीची नवीन वेबसाईटही थोड्याच दिवसांमध्ये सुरु होणार असल्याचे, फेसबुकचे मुख्य विपणन अधिकारी अँटोनिओ लुसिओ यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment