यंदाच्या आयपीएलमध्ये होणार नाही ओपनिंग सेरेमनी

भारतीय क्रिकेट बोर्डाने  (बीसीसीआय) आयपीएलचा उद्घाटन समारंभ न करण्याचा निर्णय घेतला आहे. या सोहळ्यात अनेक सेलिब्रेटीज सहभागी होत असतात. मागील वर्षी याचा खर्च 30 कोटी रूपये होता. त्यामुळे यंदा उद्घाटन सोहळा न करण्याचा निर्णय आयपीएल गर्व्हनिंग काउंसिलच्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय लीगमध्ये केवळ नो-बॉलवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी चौथ्या अंपायरची नेमणूक असेल, असाही निर्णय घेण्यात आला आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानुसार, उद्घाटन सोहळा हे केवळ पैशांची उधळपट्टी आहे. यामध्ये क्रिकेट चाहत्यांची रूची दिसत नाही आणि कलाकारांना देखील मोठे मानधन द्यावे लागते. मागील काही उद्घाटन सोहळ्यात अनेक बॉलिवुड आणि आतरराष्ट्रीय स्टार्सनी भाग घेतला आहे.

नो-बॉलच्या निर्णयावर एका अधिकाऱ्याने सांगितले की, मागील सीझनमध्ये अनेक खेळाडूंना आउट देण्यात आले होते. मात्र नंतर रिप्लेमध्ये गोलंदाजांनी ओव्हरस्टेप केल्याचे दिसून आले होते. त्यामुळे मोठा विवाद झाला होता. यंदा आयपीएलचा लिलाव 19 डिसेंबरला कोलकातामध्ये होणार आहे. सौरव गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यापासून अनेक गोष्टीत सुधारणा करण्यात येत आहे.

2019 मध्ये फ्रँचायझींना खेळाडू विकत घेण्यासाठी 82 कोटी रूपयांची रक्कम खर्च करण्याची परवानगी देण्यात आली होती. 2020 मध्ये ही रक्कम 85 कोटी रूपये करण्यात आली आहे.

Leave a Comment