आता आयकर विभागाच्या संकेतस्थळावर त्वरित मिळणार पॅनकार्ड

आयकर विभाग पॅनकार्डधारकांसाठी लवकरच एक नवीन सुविधा देणार आहे. आता थेट वेबसाइटद्वारे त्वरित पर्मेंनट अकाउंट नंबर (पॅन) दिले जाणार आहेत. यासाठी आधारकार्डच्या डेटाबेसचा वापर केला जाईल. या सुविधेला इलेक्ट्रिक पॅन असे नाव देण्यात आले आहे.

पुढील काही आठवड्यांमध्ये ही सुविधा सुरू होईल. पॅनकार्डची डुप्लिकेट कॉपी हवी असणाऱ्यासांठी देखील आता काम सोपे होईल. ईपॅन ही सुविधा मोफत असेल. 8 दिवस चाललेल्या पायलट प्रोजेक्टमध्ये आतापर्यंत 62 हजारांपेक्षा अधिक ईपॅन देण्यात आले.

कसे काढाल ईपॅन ?

ईपॅन हवे असणाऱ्यांना आधारकार्डची माहिती द्यावी लागेल. यानंतर आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर तुमची माहिती एक्सेस केली जाईल. काही बेसिक माहिती व्यतरिक्त तुम्हाला कोणतीही कागदपत्रे द्यावी लागणार नाही.

एकदा पॅनकार्ड जनरेट केल्यानंतर तुम्ही डिजिटल साइन्ड ईपॅन काढू शकता. यामध्ये एक क्यूआरकोड असेल जे फोटोसोबतच डेमोग्रॅफिक डेटा देखील कॅप्चर करेल. क्यूआर कोडमधील माहिती ही इनक्रिप्टेड असेल.

Leave a Comment