
नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक कमाई करणारे गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिट हे स्मारक ठरले आहे. २४ लाख पर्यटकांनी या स्मारकाला एका वर्षात भेट दिली असून त्या माध्यमातून या स्मारकाने ६३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ताजमहालला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्येही वाढ झाली आहे. पण केवळ ५६ कोटी रुपये कमाई असून ताजमहाल कमाई करणाऱ्या स्मारक पर्यटन स्थळांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
कमाईच्या बाबतीत स्टॅच्यू ऑफ युनिटीने ताजमहलला टाकले मागे
दरम्यान ताजमहालला सर्वाधिक पर्यटक हे भेट देत असले तरी स्ट्रच्यू ऑफ युनिट स्मारकाची कमाई जास्त होत आहे. दिवसेंदिवस जगातील सर्वाधिक उंच पुतळा असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी स्मारकाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. ३१ ऑक्टोबर २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्टॅच्यू ऑफ युनिटीचे उद्घाटन झाले होते.
भारतीय पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याने कमाईच्या बाबतीत देशातील श्रेष्ठ ५ स्मारकांमध्ये बाजी मारली आहे. १८२ मीटर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या पुतळ्याची उंची आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. २९८९ रुपये हा पुतळा बनवण्यासाठी खर्च करण्यात आले असून हा पुतळा लार्सन अँड टुब्रो कंपनीने बनवला आहे. हा पुतळा सरदार सरोवर धरणापासून ३.२ किलोमीटरवर साधू बेटावर बनवण्य़ात आला आहे. ३ हजार हून अधिक मजूर आणि २५० हून अधिक इंजिनियर्स हा पुतळा बनवण्यासाठी झटत होते.
स्टॅच्यू ऑफ युनिटीनंतर ताजमहल, आग्र्याचा किल्ला, कुतुब मिनार, फतेहपूर सीकरी आणि दिल्लीचा लाल किल्ला यांचा नंबर लागतो. ताजमहलने मागच्या वर्षी ५६.८३ कोटींची कमाई केली होती.
