राज ठाकरेंच्या भेटीला कोथरुडच्या माजी महिला आमदार


पुणे : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोथरुडच्या भाजपच्या मावळत्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी भेट घेतली. मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिकीट दिल्यामुळे मेधा कुलकर्णी नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच आज राज ठाकरे यांची मेधा कुलकर्णी यांनी भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पण राज ठाकरे यांची मेधा कुलकर्णी यांनी घेतलेली भेट ही राजकीय नाही, तर मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी होती.

निवडणुकीच्या आधीही राज ठाकरेंची मेधा कुलकर्णी यांनी भेट घेतल्याची चर्चा होती. पण, त्यांनी आज मुलीच्या विवाहाचे आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे यांना भेटल्याचे त्यांनी सांगितले. मेधा कुलकर्णी आज मुंबईत असून पक्ष सोडण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही. केवळ निमंत्रण देण्यासाठीच आज त्या मुंबईत आल्या आहेत. त्यांच्या मुलीचे लग्न असल्याने त्याचे निमंत्रण त्यांनी राज ठाकरे यांना दिले.

Leave a Comment