आता ‘स्मार्ट स्टेथोस्कोप’ने थेट ईमेलद्वारे पाठवता येणार ह्रदयाचे ठोके

आयआयटी बॉम्बेच्या लॅबमध्ये ब्लूटूथ आणि इंटरनेट असणारे अँडवांस स्टेथोस्कोप तयार करण्यात आले आहे. याच्या मदतीने ह्रदयाच्या ठोक्यांचे रिडिंग ईमेल अथवा व्हॉट्सअपच्या मदतीने डॉक्टरपर्यंत पाठवता येईल. एवढेच नाही तर ग्रामीण भागातील नर्स अथवा डॉक्टर रूग्णांचे ह्रदयाचे ठोके विशेषज्ञाला पाठवू शकतात.

हे स्टेथोस्कोप गावातील प्रायमेरी हेल्थ सेंटरमध्ये आजाराचे स्क्रिनिंगकरून लहान मुलांच्या ह्रदयात छेद असल्याची देखील माहिती देईल. सर्वसाधारण स्टेथोस्कोपच्या मदतीने हे स्टथोस्कोप जवळपास 35 पट अधिक चांगल्या पद्धतीने ह्रदयाचे ठोके ऐकते. याला ‘आयू सिंक’ असे नाव देण्यात आलेले आहे. याचे नवीन व्हर्जन बनविणाऱ्या टीमचे सदस्य तपस पांडेने सांगितले की, आयू सिंकच्या मदतीने ह्रदयाचे ठोके आयू शेअर अॅपवर रेकॉर्ड केली जाऊ शकतात.

या अॅपद्वारे ध्वनीचा फोनो कार्डिओ-ग्राफ देखील बनवला जाऊ शकतो. त्याच्या मदतीने ह्रदयाच्या ठोक्यांची गती समजण्यास मदत होते.

तपसने सांगितले की, या डिव्हाईसने ईएमआयईएमसी चाचणी यशस्वीरित्या पुर्ण केली आहे. स्मार्ट आयू सिंकमध्ये बॅटरी लावावी लागते. जी 18 तास चालते. याची किंमत 14 हजार रूपये आहे. महाराष्ट्र आरोग्य विभाग असे 100 स्टेथोस्कोप खरेदी करणार आहे.

Leave a Comment