
आजच्या स्मार्टयुगात आपल्यापैकी अनेकांनी मनगटी घड्याळांचा त्याग केलेला आहे. याचा परिणाम देखील आपण पाहत आहोत. पण आपल्यापैकी अनेकजण स्मार्ट वॉचचा पर्याय देखील वापरत आहेत. याला मात्र अपवाद ठरत आहेत बॉलीवूड सेलिब्रेटी. कारण लक्झरी घड्याळांच्या बाबतीत आपले बॉलिवूड सेलिब्रेटीही मागे नाहीत. अनेक बॉलिवूडकरांचा रोलेक्स पासून ओमेगा पर्यंत ब्रँडेड घड्याळं वापरणाऱ्यांच्या यादीत समावेश आहे. पण ब्रँडेड घड्याळांचे काही असे बॉलिवूडकर ज्यांना एवढे वेड आहे की त्यांना त्याची किंमत महत्वाची वाटत नाही. अशाच काही पाच बॉलीवूड सेलिब्रेटी सांगणार आहोत जे बहुमूल्य घड्याळांचे शौकिन आहेत.

अभिनेता इमरान हाश्मीचे नाव महागडी आणि ब्रँडेड घड्याळ वापरणाऱ्यांच्या यादीत सर्वात अगोदर घेतले जाते. ब्रँडेड घड्याळांचे इमरानला भयंकर वेड आहे. अनेक ब्रँडेड घड्याळ त्यांच्याकडे आहेत. पण इमरानचा Audemars Piguet हा आवडता ब्रँड आहे. आतापर्यंत फक्त 32 पिस या घड्याळाचे बनले आहेत आणि हे घड्याळ भारतात फक्त इमरान हाश्मीकडे आहे. या घड्याळाची 2.1 कोटी रुपये एवढी किंमत आहे.

TAG heuer या घड्याळाच्या ब्रँडची बॉलिवूडचा किंग शाहरुख खान जाहीरात करतो. हा ब्रँडही शाहरुखमुळे फेमस झाला आहे. पण शाहरुखचा Rolex Cosmograph हा आवडता ब्रँड आहे. नेहमीच व्हाइट गोल्ड डाय असलेले Rolex Cosmograph वापरताना तो दिसतो. 12 लाख रुपये एवढी या घड्याळाची किंमत आहे.

महागड्या आणि ब्रँडेड घड्याळांची सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री दीपिका पादुकोणही शौकीन आहे. दीपिकाचा Tissot हा आवडता ब्रँड आहे. Tissotचे ‘क्लासिक प्रिंस डायमंड रोज गोल्ड वॉच’ ती नेहमी वापरते. 8 लाख रुपये तिच्या या घड्याळाची किंमत आहे.

महागड्या घड्याळांचे ज्यूनिअर बच्चन अभिषेककडेही कलेक्शन आहे. Seamaster 300 omega master हे घड्याळ सध्या तो वापरतो. जवळपास साडेसात लाख रुपये या घड्याळाची किंमत आहे.
