भारतीय नागरिक नसलेल्या ‘या’ अभिनेत्री गाजवत आहेत बॉलिवूड


भारताचे नाव जगभरात पोहचविण्यात हिंदी सिनेसृष्टीचा देखील खारीचा वाटा असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांनी सातासमुद्रापार भारताचा डंका वाजवला आहे आणि आजमितीस देखील ते जागतिक स्तरावर आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. पण आज आम्ही तुम्हाला अशी काही माहिती सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला आश्चर्यचा धक्का बसणार आहे. बॉलीवूडमध्ये काही अभिनेत्री अशा आहेत ज्या भारतीय नागरिकच नाही आहेत. कारण या अभिनेत्रींचा जन्म परदेशात झाला असल्यामुळे त्यांना तिकडचे नागरिकत्व मिळाले आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत त्या अभिनेत्री…

सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून डिंपल गर्ल दीपिका पादुकोण ओळखली जाते. पण आपल्यापैकी फारच कमी लोकांना माहित आहे की, भारतीय नागरिकत्त्व दीपिकाकडे नाही. डेन्मार्कमधील कोपेनहेगन येथील तिचा जन्म आहे. पण तिचे कुटुंब दीपिका 1 वर्षाची असताना बंगळुरूला शिफ्ट झाले. दीपिका आज फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही प्रसिद्ध आहे.

अभिनेत्री कतरिना कैफसुद्धा भारतीय नागरिक नसून ती एक ब्रिटीश मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिचे खरे नाव कॅटरिना टरकॉट असून जवळपास 10 वर्ष ती बॉलिवूडमध्ये काम करत आहे. सुरुवातीला हिंदी भाषा येत नसल्याने कतरिनाला बॉलिवूडमध्ये काम करताना अनेक समस्या आल्या.

भट्ट कुटुंबियांची लाडकी लेक त्याचबरोबर करोडो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारी आलिया भट सुद्धा भारतीय नागरिक नाही. आलियाची आई सोनी राजदान या काश्मीरी जर्मन आहेत. तर वडील महेश भट गुजराती आहेत. आलियाकडे ब्रिटीश नागरिकत्त्व आहे.

श्रीलंकन अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिचे वडील तमिळ श्रीलंकन तर आई मलेशियन आहे. पण आज बॉलिवूडमधील जॅकलीन एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Leave a Comment