नवी दिल्लीतील राजपथचे नवीन डिझाईन करण्यासाठी निवड करण्यात आलेल्या आर्किटेक्ट फर्मने पंतप्रधानांचे निवासस्थान असलेले 7, लोक कल्याण मार्गवरून रायसीना हिल्सच्या (राष्ट्रपती भवन) दक्षिणेकडील डलहौसी रोड हट्मेंट्स येथे हलविण्याचा सल्ला दिला आहे.
…तर पंतप्रधानांच्या घराचा पत्ता लवकरच बदलणार
याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतरच पंतप्रधानांचे निवासस्थान आणि पंतप्रधान कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
अहमदाबाद येथील आर्किटेक्चर आणि अर्बन डिझाईन कंपनी एचपीसी डिझाईनने पंतप्रधान निवासस्थान आणि राजपथवरील अनेक गोष्टी बदलण्याचे सुचविले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंपनीची निवड करणे हा पहिला टप्पा असून, इतर सर्वबाबी लक्षात घेऊन, विचार करूनच पुढील निर्णय घेण्यात येईल.
सरकार या नवीन निर्मितीसाठी 10 हजार कोटी रूपये खर्च करणार असून, मार्च 2024 ही संपुर्ण निर्मिती प्रक्रिया पुर्ण होण्यासाठी डेडलाईन ठेवण्यात आली आहे.
