सेना-भाजपच्या 50-50 फॉर्म्युल्यावर ओवेसी म्हणतात…

महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून अनेक दिवस उलटले असले तर सर्वाधिक जागा मिळालेले भाजप-शिवसेना पक्ष सरकार स्थापनेसाठी कोणत्याही हालचाली करताना दिसत नाही. दोन्ही पक्षांमध्ये सत्तेत 50-50 वाटा हवा असल्याच्या मुद्यावरून संघर्ष सुरू आहे. आता याच पार्श्वभुमीवर  एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी दोन्ही पक्षांना लक्ष्य केले आहे. 50-50 हे काय असते हे नवीन बिस्कीट आहे का ?, असे म्हणत दोन्ही पक्षांवर टीका केली.

ओवेसी म्हणाले की, हे 50-50 नेमकं काय असते ? हे नवीन बिस्कीट आहे का ? तुम्ही कितीकाळ 50-50 करणार ? काहीतरी महाराष्ट्रातील नागरिकांसाठी शिल्लक ठेवा. भाजप-शिवसेनाला पावसामुळे सातऱ्यात झालेल्या नुकसानाचे काहीही वाटत नाही. ते केवळ 50-50 याविषयीच बोलत आहेत. यालाच ‘सबका साथ सबका विकास’ म्हणतात का?

दरम्यान, मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षांमध्ये सध्या जुंपली आहे. निकाल लागून अनेक दिवस झाले असले तरी अद्याप नवीन सरकार स्थापन झालेले नाही. त्यामुळे कोणता पक्ष कोणाला पाठिंबा देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment