Video : बघा ‘सुपरगर्ल’ हरमनप्रीतने पकडलेला अफलातून कॅच

सध्या भारतीय महिला क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिजच्या संघामध्ये एकदिवयीय मालिका खेळली जात आहे. दोन्ही संघांमधील पहिला एकदिवसीय सामना सर व्हिवियन रिर्चड्स स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिला संघाचा अवघ्या 1 धावेने पराभव झाला. भारताचा पराभव झाला असला तर एक गोष्ट या सामन्यातील चर्चेचा विषय ठरली ती म्हणजे भारतीय खेळाडू हरमनप्रीत कौरने पकडलेला अफलातून कॅच.

हरमनप्रीतने पकडलेला हा कॅच बघून स्टेडियमधील प्रेक्षक देखील आश्चर्यचकित झाले.

वेस्टइंडिजचा संघ फलंदाजी करत असताना 50 व्या ओव्हरमध्ये स्टॅफनी टेलरचा हरमनप्रीतने लाँग ऑन बाउंड्रीवर शानदार कॅच पकडला. तिने एखाद्या सुपरगर्लप्रमाणे हवेत उडी घेत अफलातून कॅच पकडला.

सोशल मीडियावर देखील तिच्या या कॅचचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकरी तिच्या या कॅचचे कौतूक करत आहेत. भारतीय महिला संघाने सामना गमावला असला तर हरमनप्रीतने आपल्या कॅचद्वारे सर्वांची मने जिंकली.

Leave a Comment