मोदींच्या हत्येची धमकी देणाऱ्या पाक गायिकेचा न्यूड व्हिडीओ व्हायरल


इस्लामाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येची धमकी देऊन चर्चेत येणारी पाकिस्तानी गायिका रबी पिरजादा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचे यावेळी चर्चेचं कारण आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडीओ. सोशल मीडियावर रबीचे काही न्यूड व्हिडीओ व्हायरल झाले असून हे व्हिडीओ पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याशी वाद झाल्यानंतर व्हायरल झाले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रबी ही पाकिस्तानात कायम चर्चेत आणि वादात असते. कधी वेगवेगळी वक्तव्य तर कधी वादग्रस्त ट्विटमुळे ती कायम चर्चेत असते. जम्मू आणि काश्मीरमधून 370 कलम हटविल्यानंतर रबीने मोदींना धमकी देत एक फोटो सोशल मीडियावर टाकला होता.

ती त्या फोटोत कमरेला आत्मघातकी बेल्ट लावलेला दिसत आहेत. त्यात स्फोटके भरलेली आहेत. नरेंद्र मोदी हे हुकूमशहा असून ते हिटलर आहेत त्यामुळे तुम्हाला संपविण्याची मला इच्छा असल्याचे तिने म्हटले होते. त्यावरून वादही निर्माण झाला होता. तिचे पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर असीफ गफूर यांच्याशीही ट्विटरवरून भांडण झाल्यानंतर तिचे हे व्हिडीओ व्हायरल झाले असल्यामुळे यामागे नेमके कोण आहे हे स्पष्ट होते असेही अशी प्रतिक्रिया अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केले आहे.

Leave a Comment