ऋतू बदलाचा झोपेवर परिणाम


उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असे तीन ऋतू वातावरणावर मोठा परिणाम करतात हे काही सांगण्याची गरज नाही. वातावरणात बदल झाला की आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो. त्यातल्या त्यात भुकेवर जास्तच परिणाम होतो. हिवाळ्यात भरपूर भूक लागते आणि खाल्लेले अन्न पचतेसुध्दा परंतु पावसाळ्यात केवळ भूक लागते आणि अन्न फारसे पचन होत नाही. उन्हाळ्यात तर भूकच लागत नाही. जसा ऋतू बदलाचा भूकेवर परिणाम होतो तसाच तो झोपेवरसुध्दा होतो. उष्ण हवामानाने शरीरात होणारे बदल आपल्याला फार गाढ झोप घेऊ देत नाहीत. कारण गाढ झोप घेण्यास काही विशिष्ट हार्मोन्स भाग पाडत असतात आणि उष्ण हवामानाचा त्या हार्मोन्सवर परिणाम होतात.

हा परिणाम टाळण्यासाठी आपण आपल्या झोपण्याच्या खोलीमध्ये काही बदल केले पाहिजेत. विशेषतः खोलीमध्ये व्हेेंटिलेशन चांगले असले पाहिजे. उन्हाळ्यात आधीच तर भूक लागत नाही परंतु लागली तरी झोपण्याच्या आधी जेवण करू नये. जेवण आणि झोपणे यात अंतर ठेवले पाहिजे. ते एक तासापासून तीन तासापर्यंत ठेवले पाहिजे. मात्र आपण झोपण्याच्या एकदम आधी रात्रीचे जेवण केले तर अन्न पचन करण्यावर परिणाम होऊ शकतो. अशा वेळी अन्नपचनाची जी प्रक्रिया शरीरात होते तिच्यामुळे शरीराचे तापमान वाढू शकते. उन्हाळ्यामध्ये हलके आणि ढिले कपडे घालावेत. त्यातल्या त्यात लीननसारखे नैसर्गिक धाग्यांनी बनलेले कपडे पसंत करावेत.

थंड हवामानामध्येही झोपेवर परिणाम होतो. या हवामानात छान झोप घेण्यास आवश्यक असलेले तापमान निर्माण झालेले असते. ज्या खोलीचे तापमान १५ ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल तर झोपण्यासाठी ते आदर्श हवामान समजावे. यापेक्षा कमी किंवा यापेक्षा जास्त तापमान आपल्या मनाला अस्वस्थ करते आणि त्यामुळे चांगली गाढ निरोगी झोप लागत नाही. तेव्हा शरीराचे तापमान यथास्थित राखण्यासाठी झोपण्याच्या एक किंवा दोन तास आधी कोमट पाण्याने स्नान करावे. अती थंड हवामानात शांत झोप लागत नाही. त्यामुळे पांघरूणांचे एकावर एक असे दोन-तीन थर पांघरण्याचा मोह होतो. तो योग्य आहे. झोपताना या हंगामात गरम वातावरण असले पाहिजे. डच शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनामध्ये असे आढळले आहे की तापमानातील मोठे बदल किंवा त्वरेने होणारे बदल हे संधीवाताच्या रूग्णासाठी धोकादायक असतात. या वातावरणात त्यांच्या सांध्यांमध्ये वेदना होऊ शकतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment