50 वर्षीय आईसाठी चक्क मुलगी शोधत आहे सुयोग्य वर


नवी दिल्ली: आपल्यापैकी काही पालक मंडळी आपल्या मुलांच्या लग्नाचे वय झाल्यानंतर त्यांच्यासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात असतात. पण सध्या सोशल मीडियावर जर उलटेच चित्र पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर एका मुलीची आपल्या 50 वर्षीय आईसाठी सुयोग्य वर शोधत असल्याची पोस्ट व्हायरल होत आहे. होय हे एकदम खरे आहे. तसेच या मुलीने ट्विट करत आपल्या आईसाठी कसा नवरा हवा याची लिस्ट सुद्धा शेअर केली आहे. आस्था वर्मा असे या मुलीचे नाव असून काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या आईसोबतचा फोटो शेअर करत माझ्या 50 वर्षाच्या आईसाठी मला एक देखणा, शाकाहारी आणि निर्व्यसनी वराचा शोध असल्याचे कॅप्शन दिले होते. हे ट्विट यानंतर काहीच तासात प्रचंड लोकांपर्यंत पोहचून अनेकांनी आस्थाच्या या विचाराचे कौतुक केले आहे.


आस्थाचे ट्विटर वरील प्रोफाइल पाहता ती कायद्याचे शिक्षण घेत असून ती आपल्या आईसोबत राहते असे दिसून येते. तिच्या या ट्विटला आतापर्यंत 20 हजारहून अधिक लाईक्स, साडे पाच हजार रिट्विट आणि साडे तीन हजार रिप्लाय आले आहेत. लोकांनी आस्थाच्या या ट्विटचे कौतुक करत या शोधासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही जणांनी तिला वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या, जसे की एकाने राहुल गांधी यांचा फोटो शेअर करत स्थळ म्हणून पर्याय सुचवला तर त्यावर आस्थाने रिप्लाय करत आपण स्वतःच असे होऊ देणार नाही, असे उत्तर देत नाकारले. तर एकाने तिला तू चुकीच्या साईटवर हा शोध घेत आहेत असे सांगून अप्रत्यक्षरीत्या विवाह नोंदणी साईटवर जाण्याचा मार्ग सुचवला मात्र आपण असा पर्याय ट्राय केला होता त्यात यश मिळाले नाही असे सांगत आस्थाने त्यांना उत्तर दिले. दरम्यान, हा शोध आस्थाने केवळ आपल्या आईच्या आनंदासाठी सुरु ठेवला असल्याची माहितीही दिली आहे.

Leave a Comment