तुम्ही कधी खाल्ला आहे का प्रोटीन केक?


केक ही एक अशी वस्तू आहे जो लहानांपासून मोठ्यां पर्यंत सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे. पण काही लोक जे डाएट करत असतात त्यांना ह्या केकसाठी मुकावे लागते. पण माझा पेपर डाएट करणाऱ्या आणि केक शौकिनांसाठी एक प्रोटीन केक घेऊन आले आहे. हा प्रोटीन केक तुम्ही घरच्या घरी देखील तयार करू शकता. त्यासाठी पास्त पैसे देखील मोजावे लागणार नाहीत आणि घरच्या घरी बनवलेल्या केकची उत्तम चव देखील तुम्हाला चाखायला मिळणार आहे. तर मग जाणून घेऊया १ मिनिटात कसा बनवतात प्रोटीन केक.

प्रोटीन केक कृती
3 स्कूप्स चॉकलेट फ्लेवर व्हे प्रोटीन
5 ग्राम – लोणी
1 मोठा चमचा – बदाम
1 मोठा चमचा – अक्रोड आणि आवश्यकतेनुसार पाणी

पद्धत: व्हे प्रोटीन, बटर, बदाम, अक्रोडाचे तुकडे एकत्र ढवळून त्याचे बॅटर तयार करा एर फ्राइयरच्या भांड्यामध्ये ते बॅटर काढून. ते 10 मिनिटे 160 अंशांवर शिजवावे. आपला प्रोटीन केक तयार आहे. त्यावर चॉकलेट सॉस घालून सर्व करा.

Leave a Comment