या पठ्ठ्याने ‘आयएएस’ अधिकारी होण्यासाठी लाथाडली २२ लाखांची नोकरी


नवी दिल्ली – आजच्या घडली प्रत्येकाचे उच्च शिक्षण घेऊन भल्यामोठ्या पगाराची नोकरी मिळावी असे स्वप्न असते, पण एका पठ्ठ्याने गलेलठ्ठ पगाराची नोकरी लाथाडून चक्क देशसेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अमेझॉन’कडून हरियाणाच्या जिंदमध्ये राहणारा हिमांशु जैन या तरुणाला २२ लाखांच्या वार्षिक पॅकेजची ऑफर मिळाली होती. पण यूपीएससी परीक्षा देऊन हिमांशुला देशसेवेचा करायची असल्यामुळे हिमांशुने ही ऑफर नाकारात त्याने यूपीएससीची परीक्षा दिली. या परीक्षेत तो देशातून ४४ वा आला आहे.

त्याने हैदराबादच्या ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी’मधून पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर अमेझॉनमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर अमेझॉनने त्याला नोकरीची ऑफर दिली होती. पण त्याला आयएएस अधिकारी व्हायचे होते. देशात बदल घडवण्याची ताकद आयएएस अधिकाराऱ्यांमध्ये असते, असे हिमांशु आपल्या शाळा महाविद्यालयातील शिक्षकांकडून नेहमीच ऐकायचा, त्याने तेव्हापासून आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलं आणि शिक्षणासाठी दिल्ली गाठली.

त्याचा युपीएससी परीक्षेचा प्रवासही संघर्षाने भरलेला होता. तो ही परीक्षा दोनदा नापास झाला. पण तिसऱ्या प्रयत्नात ही परीक्षा त्याने उत्तीर्ण होऊन दाखवली. त्याने आपले शिक्षण हैदराबादच्या ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी’मधून पूर्ण केल्यानंतर त्याने अॅमेझॉनमध्ये इंटर्नशीप केली. याकाळात अॅमेझॉनकडून त्याला २२ लाखांचे पॅकेज देण्यात आले होते, पण त्याने ही नोकरी आयएएस अधिकारी होण्याच्या स्वप्नामुळे नाकारली.

Leave a Comment