खेकड्याच्या कवचाच्या स्प्रेमुळे होणार मलेरियाला अटकाव


खेकड्याचे कवच आणि चांदीच्या सूक्ष्मकणांपासून बनलेल्या स्प्रेमुळे मलेरियाला अटकाव होऊ शकतो, असा दावा चीनमधील संशोधकांनी केला आहे. या स्प्रेमुळे मलेरियाला कारणीभूत ठरणाऱ्या डासांचा प्रसार थांबतो, असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे हा स्प्रे पर्यावरण अनुकूल असून त्याच्या चाचण्या भारतातच झाल्या आहेत.

नॅशनल तैवान ओशन युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ जियांग शियो हवांग म्हणाले, ‘‘थोड्या प्रमाणात हे द्रावण एनोफीलीस सनडाइकस या डासाच्या पैदाशीवर प्रभावी पद्धतीने अंकुश लावण्यासाठी वापरता येऊ शकते. हा डास मलेरियाचा वाहक मानला जातो. मात्र डासांचे नैसर्गिक शत्रू असलेल्या गोल्डफिशसारख्या माशांवर त्याचा काहीही परिणाम होत नाही.’’

हे संशोधन करणाऱ्यांमध्ये तमिळनाडूतील भारतियार विद्यापीठाचे शास्त्रज्ञही सामील होते. या शास्त्रज्ञांनी चिटोसान किंवा चिटिन या नैसर्गिक विषारी पदार्थाचा वापर या संशोधनासाठी केला. हा पदार्थ जखमांवरील उपचार आणि जैविक पद्धतीने नष्ट होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या पॅकेजसाठी केला जातो.
संधिपाद प्राण्यांचे कवच, पक्ष्यांची चोच किंवा किड्यांचे अंडे यांमध्ये चिटिन हा पदार्थ सापडतो, असे संशोधकांनी सांगितले.

याचे रसायनिक स्वरूप सहज बदलता येते, हा अत्यंत प्रभावी आणि निसर्गात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे तो किफायतीही आहे.

या संशोधकांनी आदी अनेक खेकड्यांच्या कवचाची पूड बनविली, ती वाळविली आणि मग त्यातून चिटिन आणि अन्य खनिज पदार्थ मिळाले. यानंतर त्यांना गाळून मिळालेल्या पांढऱ्या पदार्थासोबत सिल्वर नायट्रेट मिसळण्यात आले. त्यातून चांदीच्या सूक्ष्मकणांचे करडा-पिवळसर द्रावण मिळाले.
हे द्रावण कोईम्बतूरमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्यूनिकेबल डीसीजेजमध्ये पाण्याच्या सहा बांधांवर शिंपडण्यात आले. कमी प्रमाणात वापरूनही या द्रावणामुळे डासांचे लार्वा आणि प्यूपा नष्ट झाल्याचे संशोधकांना आढळले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment