केंद्रशासित प्रदेश लद्दाखला मराठमोळ्या सतीश खंदारे यांच्या रुपात मिळाले पहिले पोलीस प्रमुख


नवी दिल्ली – 31 ऑक्टोबरपासून केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आलेल्या लद्दाखच्या पोलीस प्रमुखपदी मराठमोळ्या सतीश खंदारे यांची नियुक्ती करण्यात आली. लद्दाखचे अमरावतीच्या धामणगावचे सूपुत्र असलेले खंदारे हे पहिले मराठी पोलीस प्रमुख ठरले आहेत. 1995 च्या बॅचचे खंदारे हे आयपीएस अधिकारी आहेत. संपूर्ण राज्यातून खंदारे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून जम्मू-काश्मीर आणि लद्दाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश केंद्र सरकारने निर्माण केले. हे दोन्ही राज्य गुरूवारपासून केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आले असल्यामुळे खंदारे यांची लद्दाखच्या पोलीस प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

खंदारे हे 1995 मध्ये 425 वी रँक घेऊन आयपीएस अधिकरी झाले. धामणगाव तालुक्यातील जळका पटाचे येथील अशोक विद्यालयातून त्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली. त्यानंतर धामणगाव शहरातील सेफला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून ते बारावी उत्तीर्ण झाले. पुणे येथील सीओयुपी अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते 1992 मध्ये बीईचे खंदारे यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर खंदारे दोन वर्षांनी आयपीएस झाले. खंदारे आयपीएस अधिकारी झाल्यानंतर जम्मू-काश्मीर कॅडरमध्ये दाखल झाले. त्यांनी त्यानंतर श्रीनगर परिसरात वेगवेगळ्या जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार सांभाळला.

2005 मध्ये खंदारे यांनी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक, 2007 मध्ये पुणे येथे पोलीस उपमहानिरीक्षक, तर सीआरपीएफ नागपूर येथे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक, खारघर येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल विभागात पोलीस उप महानिरीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला.

Leave a Comment