मॅक्सिकोमध्ये सुरू झाला ‘मृतांचा दिवस’

मॅक्सिकोमध्ये दोन दिवस चालणाऱ्ये ‘डे ऑफ द डेड’ म्हणजेच ‘मृतांचा दिवस’ सणाची सुरूवात झाली आहे. शहरातील रस्त्यांवर मोठमोठे सापळे ठेवण्यात आले आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी हे सापळे ठेवण्यात आले आहेत.

(Source)

रस्त्यावर ठेवण्यात आलेले हे सापळे कार्डबोर्डद्वारे बनविण्यात आलेले आहेत. स्थानिक कलाकारांना हा सापळा बनविला असून, 29 ऑक्टोंबरला हा सापळ रस्त्यावर ठेवण्यात आला आहे. सांगण्यात येते की मागील 2000 वर्षांपासून डे ऑफ द डेडची परंपरा सुरू आहे.

या दिवशी आपल्या मृत नातेवाईंकाची आठवण काढली जाते. अशी मान्यता आहे की, पूर्वजांची आत्मा एकदिवस आपल्या कुटूंबाबरोबर राहिला येते. या निमित्ताने शहरात कॅटेरिना परेड काढण्यात आली होती. यात शेकडो लोकांनी भाग घेतला.

(Source)

या परेडमध्ये लोकांनी सापळ्याची वेशभुषा केली होती. मॅक्सिकन कार्टुनिस्ट जोसे ग्वाडालूपे पोसादा यांनी 100 वर्षांपुर्वी एक सापळा बनवला होता व त्याला कॅटेरिना असे नाव दिले होते.

संपुर्ण मॅक्सिकोमध्ये या दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते व लोक उत्साहाने यात सहभागी होतात.

 

Leave a Comment