मुले नरभक्षी होण्यामागे भाजप नेत्याचा अजब दावा


भोपाळ : अंगणवाडी मुलांसाठी, गर्भवती महिला आणि शाळांमधील माध्यान्ह जेवणात अंडी देण्याचा निर्णय मध्यप्रदेशमध्ये कलमनाथ सरकारने घेतला असून हा निर्णय मध्यप्रदेशमधून कुपोषण दूर करण्यासाठी, कुपोषणाशी लढण्यासाठी मुलांना जेवणात अंडी देण्याचा घेण्यात आला. पण हा निर्णय विरोधकांच्या आक्षेपानंतर मागे घेण्यात आला. भाजपने सरकारच्या अंडी देण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे.

भाजपने सरकारच्या अंडी देण्याच्या निर्णयावर धार्मिक भावना दुखवल्या जाण्याचे सांगितले. तर दुसरीकडे काँग्रेसने अंडी शाहाकारी असून ते महिला आणि मुलांच्या आरोग्यासाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. भाजप नेता गोपाल भार्गव यांनी शाळांमधील माध्यान्य जेवणात, अंगणवाडी मुले आणि गर्भवती महिलांना अंडी देण्याच्या सरकारच्या निर्णयावर सांगितले की, जे भारताचे संस्कार आहेत, सनातन संस्कृतीमध्ये मांसाहार निषेध आहे. लहानपणापासूनच मुलांना मांसाहार दिल्यास मुले मोठी होऊन नरभक्षी होऊ शकतात. तसेच धार्मिक भावना यामुळे दुखावल्या जाऊ शकतात, असे म्हटले आहे.

माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील कुपोषण दूर करण्यासाठी अंगणवाडी मुलांना अंडी खाण्यास देण्याच्या कमलनाथ सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे. कोणी काय खाल्ले पाहिजे? हे प्रत्येकावर अवलंबून आहे. पण सरकारकडून अंडी दिली गेल्यास, न खाणाऱ्यालादेखील अंडी जबरदस्ती खायला लागू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी मुलांना अंडी खाण्यास देण्याच्या निर्णयाला विरोध करत अंड्याला आणखीही काही पर्याय उपलब्ध आहे. पोषण आहारासाठी अंड्याशिवाय अनेक पर्याय आहेत. आमचे सरकार असताना अंड्याच्या या प्रस्तावाला आम्ही विरोध करत, त्याऐवजी अंगणवाडीमध्ये दूध देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

अंडी देण्याच्या निर्णयावर ठाम असलेल्या मध्यप्रदेशच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री इमरती देवी यांनी, अंडी शाहाकारी असल्याचे सांगितले. अंडी का खाऊ नये? असा सवाल करत त्यांनी, आपल्या सर्वांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी सर्व खावे लागेल. असे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी गोपाल भार्गव यांच्या नरभक्षी विधानावर बोलताना, त्यांच्या बोलण्याने काही होणार नाही. मध्यप्रदेश कुपोषणमुक्त होण्याची माझी इच्छा आहे. त्यांच्या बोलण्याने काय होते? त्यांच्यासारखे हॉटेलमध्ये जाऊन मांसाहार करत असल्याची टीकादेखील त्यांनी केली आहे.

Leave a Comment