Video : स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीरांनी घेतला चक्क बेसबॉल खेळण्याचा आनंद

अंतराळातील आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीरांनी चक्त फ्रेंडली बेसबॉल सामना खेळण्याची कामगिरी केली. याचा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये अंतराळवीर मेअर, ख्रिस्टिना कोच आणि अँड्र्यू मॉर्गन खेळताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मेअर कोचच्या दिशेने बॉल फेकते आणि दोघींच्या मधे उभा असलेला मॉर्गन फ्लॅशलाइटचा वापर करून शॉट मारत आहे. बॉल प्लॅशलाइटला लागल्यावर पुन्हा मेअरच्या हातात जातो.

याचा एक फोटो देखील जेसिका मेअरने ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये स्पेस स्टेशनच्या विंडोमध्ये पृथ्वी देखील दिसत आहे. मेअरने ट्विट करत लिहिले की, आशा आहे की, 17500 मैल ताशी वेगाने फिरणाऱ्या स्पेस स्टेशनमधील सामन्याचा सर्वांनी आनंद घेतला असेल. आशा आहे की, लवकरच पृथ्वीवर परतून वर्ल्ड सीरिज बघता येईल.

काही दिवसांपुर्वीच मेअर आणि कोचने अंतराळात स्पेस वॉक करत इतिहास रचला होता. दोघींनी 7 तास अंतराळात स्पेस वॉक केला होता.

 

Leave a Comment