शिवसेनेच्या प्रवक्त्याला जीवे मारण्याची धमकी


मुंबई – जीवे मारण्याची धमकी शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी आणि दहिसरमधील शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांना मिळाली असून ट्विटरच्या माध्यमातून त्यांना ही धमकी एका अज्ञाताने दिली आहे. बोरीवलीतील एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.


प्रियंका चतुर्वेदी आणि शीतल म्हात्रे यांना टॅग करून संबंधित व्यक्तीने ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी दिली. ही बाब आपले ट्विटर अकाऊंट तपासताना ध्यानात आल्याचे शीतल म्हात्रे यांनी सांगितले. तसेच यानंतर त्यांनी त्या मेसेजचा स्क्रीनशॉट घेत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. धमकी देणाऱ्या इसमाचे नाव आशिष केआर द्विवेदी असे असून त्याने @ASHISHKRDW2 या अकांऊंटवरून प्रियंका चतुर्वेदी आणि शीतल म्हात्रे यांना धमकी दिली आहे. कलम ५०६ अंतर्गत शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून सध्या आरोपीचा शोध घेत अल्याची माहितीही देण्यात आली आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांनी लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकत हाती शिवबंधन बांधले होते. त्यांनी त्यापूर्वी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी पार पाडली होती. सर्वांनाच त्यांच्या या निर्णयामुळे मोठा धक्का बसला होता. त्यानंतर शिवसेनेतही प्रियंका चतुर्वेदी यांना प्रवक्तेपद देण्यात आले होते. तर शीतल म्हात्रे या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. तसेच त्या विधी व महसूल समितीच्या अध्यक्षादेखील आहेत.

Leave a Comment