पाकिस्तानात सिलेंडरच्या स्फोटात 65 जणांचा मृत्यू

पाकिस्तानच्या कराची-रावळपिंडी एक्सप्रेसमध्ये आग लागल्याने 65 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत 30 लोक जखमी झाले आहेत. ही घटना लियाकतपूर येथे घडली. जखमीना उपचारासाठी जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, अग्निशामक दल आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे.

या आगीचे कारण गॅस सिलेंडर फुटल्याचे सांगण्यात येत आहे. एक प्रवासी सिलेंडर घेऊन प्रवास करत होता. हा प्रवासी रेल्वेमध्ये नाश्ता बनवत असताना अचानक आग लागली. सिलेंडरच्या स्फोटामुळे तीन डब्ब्यांना आग लागली.

मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश असून, अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. याशिवाय अनेक लोकांनी रेल्वेमधून उडी मारून स्वतःचे प्राण वाचवले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील या घटनेवर दुख व्यक्त करत, जखमींना तातडीने उपचार देण्याचे आदेश आधिकाऱ्यांना दिले आहेत.

Leave a Comment