प्रदर्शनासाठी सज्ज झाला श्रेयस तळपदेचा ‘सरकार की सेवा में’


अभिनेता श्रेयस तळपदे दिग्दर्शित दुसरा बॉलीवूडपट सरकार की सेवा मे प्रदर्शनासाठी सज्ज असून नुकेतच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हे पोस्टर ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, लवकरच श्रेयस तळपदेचा नवा चित्रपट ‘सरकार की सेवा में’ आपल्या भेटीला येत आहे. यात श्रेयसचीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राज भट्टाचार्य आणि हरिहरन अय्यर याचे निर्माते आहेत. पोस्टर बॉईज चित्रपटानंतर श्रेयसचा हा दुसरा हिंदी चित्रपट आहे.


श्रेयस पोस्टरमध्ये पांढऱ्या कारच्या समोर बसला आहे. पोलिसाची टोपी त्याने परिधान केल्याचे दिसते. चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशातील एका छोट्या शहरातील ही सत्यकथा आहे. श्रेयस चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाला, या चित्रपटाचा बराचसा भाग छोट्या शहराच्या रस्त्यावर शूट करणे मोठे आव्हान होते. परंतु यासारख्या प्रामाणिक कथेसाठी याहून वेगळ्या पध्दतीने कथन करणे शक्य नव्हते. या चित्रपटात श्रेयसच्या बरोबरीने श्रध्दा जयस्वाल, सुधीर पांडे, चेतना पांडे, ब्रिजेंद्र काला आणि सुशिल सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Leave a Comment