ऑस्ट्रेलियाच्या या स्टार खेळाडूने मानसिक आजारामुळे सोडले क्रिकेट

श्रीलंकेविरूध्द टी20 मालिका खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचे मानसिक स्वास्थ्य बिघडलं आहे. सायकोलॉजिस्ट मायकल लॉयडने देखील याबाबत माहिती देत सांगितले की, मॅक्सवेलला सध्या मानसिक आजाराचा सामना करावा लागत आहे. मॅक्सवेलने स्वतः याबाबत माहिती देत क्रिकेटपासून काही काळासाठी विश्रांती घेत असल्याचे सांगितले.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने मॅक्सवेलच्या निर्णयाची घोषणा करत त्याच्या जागी डीआर्सी शॉर्टला संघात स्थान दिले आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सपोर्ट टीमचे सायकोलॉजिस्ट डॉक्टर मायकल लॉयड यांनी सांगितले की, मानसिक आरोग्य ठीक नसल्याने मॅक्सवेलने अनिश्चित काळासाठी क्रिकेट सोडले आहे. तो काही दिवस आपल्या कुटूंबाबरोबर वेळ घालवणार आहे.

मॅक्सवेलने श्रीलंकेविरूध्दच्या पहिल्या टी20 सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत 28 चेंडूमध्ये 62 धावा केल्या होत्या.

Leave a Comment