लालूंचा बायोपिक असलेला ‘लालटेन’ पुढच्यावर्षी फेब्रुवारीमध्ये होणार रिलीज


चारा घोटाळा प्रकरणी सध्या तुरुंगवासात असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवला जात असून “लालटेन” असे लालूच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचे नाव असेल. लालू यांची पार्टीचे चिन्हदेखील लालटेन म्हणजे कंदीलच आहे. हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये रिलीज होऊ शकतो.

सध्या लालू प्रसाद यादव हे प्रकृतीच्या कारणामुळे ते रिम्समध्ये उपचार घेत आहेत. भोजपुरी कलाकार यश कुमार “लालटेन” मध्ये लालू प्रसाद यादव यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर स्मृती सिन्हा त्यांची पत्नी राबडी देवीच्या भूमिकेत दिसणार आहे. बिहार आणि गुजरातमध्ये शूट झालेला हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार आहे. लालू प्रसाद यादव चारा घोटाळ्यात दोषी ठरलेले आहेत. लालू यांना या प्रकरणी १४ वर्षांचा तुरुंगवास झाला आहे.

Leave a Comment