‘दबंग 3’चे पहिले-वहिले गाणे तुमच्या भेटीला


सध्या आपला आगामी दबंग 3 या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बॉलीवूड अभिनेता सलमान खान व्यस्त आहे. यावर्षी 20 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होत आहे. पुन्हा एकदा चुलबुल पांडेच्या धमाकेदार अवतारात सलमान खान दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला दिसला. त्यानंतर या चित्रपटातील पहिले गाणे आता नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे टी सीरिजच्या ऑफिशिअल युट्यूबवरून रिलीज करण्यात आले आहे.

आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन याविषयीची माहिती सलमान खानने दिली. हे गाणे सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. पण हे फक्त ऑडिओ साँग असून याचा व्हिडीओ अद्याप रिलीज झालेला नसल्यामुळे सलमानच्या चाहत्यांना आता या गाण्याच्या व्हिडीओची रिलीजची उत्सुकता लागुन राहिली आहे. सलमानचे या गाण्याच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो व्हायरल झाले होते.

दबंगमध्ये दिसलेली सलमान आणि सोनाक्षी यांची केमेस्ट्री या चित्रपटात पुन्हा एकदा दिसणार आहे. या चित्रपटातून मराठी सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर बॉलिवूड पदार्पण करत आहे. या चित्रपटात सलमान ‘पोलिसवाला गुंडा’ झाला आहे. सलमान त्याच बरोबर या चित्रपटात सईसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार सलमानने स्वतः दबंग 3 साठी काही संवाद लिहिले आहेत. तसेच त्याच्या सांगण्यावरून चित्रपटाच्या काही डायलॉग्समध्येही बदल करण्यात आले आहेत. नेहमीच सेटवर सलमान इनपुट्स देत असतो. ज्याचा चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये समावेश केला जातो. याशिवाय तो हाय ऑक्टेन अ‍ॅक्शन सीनच्या कोरिओग्राफीमध्येही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.

सलमान खान व्यतिरिक्त ‘दबंग 3’मध्ये सोनाक्षी सिन्हा आणि अरबाज खान दिसणार आहेत. हिंदी सोबतच तमिळ, तेलुगू आणि कन्नड या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे सलमान स्वतःच या तिन्ही भाषांमध्ये हा चित्रपट डब करणार आहे. हा चित्रपट 20 डिसेंबरला रिलीज होत असून याचं दिग्दर्शन साउथ सुपरस्टार प्रभुदेवा करत आहे.

Leave a Comment