बापरे ! 13 लाख भारतीयांच्या डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती विक्रीसाठी उपलब्ध

जवळपास 13 लाख भारतीय बँक ग्राहकांच्या डेबिट-क्रेडिट कार्ड्सची माहिती चोरी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  चोरी करण्यात आलेली माहिती डार्कवेबवर जवळपास 130 मिलियन डॉलरमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे.

या कार्डांची माहिती जोकर्स स्टॅशवर उपलब्ध आहे. जोकर्स स्टॅश डार्क वेबवर सर्वात जुन्या कार्ड्स शॉप्स पैकी एक आहे. कार्ड्स वेब असे ठिकाण आहे, जेथे हॅकर्स मोठ्या संख्येत कार्ड्सची माहिती विकतात.

या कार्डची माहिती विकण्यासाठी जोकर्स स्टॅशने “INDIA-MIX-NEW-01” या नावाखाली जाहिरात केली आहे. विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या कार्ड्सची माहिती विविध बँकेच्या ग्राहकांची असून, प्रत्येकाची किंमत जवळपास 100 डॉलर्स आहे. मागील काही वर्षांमध्ये कार्ड्सची माहिती चोरी होण्याची ही सर्वात मोठी घटना आहे.

विश्लेषकांनुसार, ही माहिती स्किमिंग डिव्हाईसद्वारे एटीएम मशीन आणि पॉइंटसेल मशीनचा वापर केल्यानंतर चोरण्यात आली आहे.

याशिवाय चोरी करण्यात आलेल्या माहितीमध्ये ट्रॅक डाटा-2 चा देखील समावेश आहे. यामध्ये ग्राहकाच्या कार्डाच्या माहितीबरोबरच ग्राहकाचे नाव, खाजगी माहिती आणि व्यवहाराची सर्व माहिती असते. तर ट्रॅक-1 मध्ये केवळ कार्ड्सची माहिती असते.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये 2.15 मिलियन अमेरिकन नागरिकांच्या कार्ड्सची माहिती देखील अशाच प्रकारे विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.

 

Leave a Comment