धनंजय मुंडे रुग्णालयात, कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नका. माझी प्रकृत्ती उत्तम


मुंबई – अचानक पोटात दुखू लागल्याने परळी विधानसभेचे नवनियुक्त आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत उत्तम असून, काळजीचे कारण नसल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.


धनंजय मुंडे यांना बुधवारी अचानक पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यामुळे ते लगेच बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर मुंडेंनी त्यांच्या ट्विटरवरुन माहिती दिली. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नका. माझी प्रकृत्ती उत्तम असल्याचे मुंडेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे. शिवाय, सर्वांच्या सदिच्छेबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Comment