मराठमोळे शरद बोबडे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश


नवी दिल्ली : 17 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई निवृत्त होत असून आता त्यांच्यानंतर मराठमोळे न्यायाधीश शरद बोबडे यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती होणार आहे. रंजन गोगोई यांनी स्वतः केंद्र सरकारला नवे सरन्यायाधीश म्हणून एस. ए. बोबडे यांचे नाव सुचवल्यानंतर त्यास आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी मिळाली आहे. बोबडे 18 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत.

सध्या रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष पीठाचे न्यायमूर्ती बोबडे सदस्य आहेत. याशिवाय अनेक मोठ्या निकालांमध्ये त्यांचा समावेश होता. याआधी यशवंत विष्णू चंद्रचूड हे सरन्यायाधीश होणारे पहिले मराठमोळे व्यक्ती होते. ते सर्वाधिक काळ म्हणजेच 7 वर्ष 4 महिने सरन्यायाधीश पदावर कार्यरत होते.

Leave a Comment