बाजारपेठेत दाखल झाला मोटोरोलाचा 75 इंचाचा 4K UHD स्मार्ट टीव्ही


भारतीय बाजारपेठेत मोटोरोलाने आपला नवा 4K UHD स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. या टीव्हीमध्ये 75 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह डॉल्बी व्हिजन आणि HDR 10 चा सपोर्ट देण्यात आला आहे. गुगल असिस्टंट अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणाऱ्या या टीव्हीमध्ये इनबिल्ट असून याच्या मदतीने युजर व्हॉईस कमांडद्वारे सर्च करू शकतो. त्याचबरोबर यात 30W बॉटम फायरिंग स्पीकर्स आहेत. तसेच यामध्ये दर्जेदार साउंड आउटपुटसाठी DTS सराउंड साउंड टेक्नॉलॉजी आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्ट आहे.

डॉल्बी व्हिजन आणि एचडीआर 10 तंत्रज्ञानाचा वापर यात करण्यात आल्यामुळे युजरला अतिशय दर्जेदार व सजीव वाटणार्‍या चलचित्राचा आनंद घेता येणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. यात डॉल्बी ऑडिओ आणि डीटीएस सराऊंड साऊंड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. हा टीव्ही आपण ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे खरेदी करु शकता. हा टीव्ही फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर 1,19,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर या टीव्हीच्या खरेदीवर SBI च्या कार्डधारकांना 10 टक्के आणि अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना 5 टक्के डिस्काउंट मिळेल. टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ यांसारखे एंटरटेनमेंट फीचर्स आहेत. क्वॉडकोर CA53 प्रोसेसर असलेल्या या टीव्हीमध्ये 16 जीबीचे इनबिल्ट स्टोअरेज दिलेले आहे. हा टीव्ही लाँच होईपर्यंत मोटोरोलाकडे 32 इंच ते 65 इंचापर्यंतचेच टीव्ही उपलब्ध होते.

Leave a Comment