हलाखीचे जीवन व्यतीत करत आहे अशोक सराफ यांची ‘प्रियतम्मा’


मराठीतील आजवरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून १९८५ साली प्रदर्शित झालेला ‘धुमधडाका’ हा चित्रपट ओळखला जातो. या चित्रपटातील गाणी व डायलॉग्स आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. या चित्रपटात झळकलेले अशोक सराफ, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता जोशी-सराफ, प्रेमा किरण असे सर्वच कलाकार आज मराठीतील नामवंत कलाकार म्हणून ओळखले जातात. आणखी एका अभिनेत्रीने या चित्रपटात आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली होती. पण ती अभिनेत्री आज ओळखताही येणार अशा अवस्थेत हलाखीचे जीवन व्यतीत करत आहे.

ऐश्वर्या राणे असे या अभिनेत्रीचे नाव असून ‘धुमधडाका’मध्ये अशोक सराफ यांच्या नायिकेचे काम ऐश्वर्या यांनी केले होते. या चित्रपटात त्यांनी अशोक सराफ यांच्याबरोबर केलेले प्रियतम्मा हे गाणे विशेष गाजले होते. पण आता अशोक सराफ यांच्या प्रियतम्मा ओखळताही येणार नाही अशा अवस्थेत आहेत.

‘मर्द’ या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ऐश्वर्या यांना अपघात झाला होता. त्या या चित्रपटात घोडेस्वारी करताना पडल्या होत्या. त्यांच्या पाठीच्या कण्याला दरम्यान जबरदस्त दुखापत झाली होती. त्यांचा कमरेखालचा भाग परिणामी लुळा पडला. उपचारासाठी त्यानंतर त्या परदेशात देखील गेल्या होत्या. परंतु उपचाराचा खर्च त्यांना परवडला नाही. त्या ट्रिटमेंटसाठी ऐश्वर्या यांनी घर, दागिने इतकेच नव्हे तर एफडीही मोडल्या. या सर्व प्रकारामुळे त्या कायमच्या सिनेसृष्टीपासून दूर गेल्या. सध्या ‘सी’ ग्रेड पेन्शन एका अपघातामुळे अपंग झालेल्या ऐश्वर्या यांना मिळते. सध्या त्या अतिशय हलाखीच्या परिस्थितीत त्यांचे जीवन व्यतीत करत आहेत. या सर्व गोष्टी विचारात घेऊन सरकार आता त्यांना ‘ए’ ग्रेड पेन्शन देणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment