आयफोनमधील या फीचरमुळे नाराज झाले डोनाल्ड ट्रम्प

अ‍ॅपल कंपनी ही आपल्या शानदार आयफोनसाठी ओळखली जाते. वेळेनुसार, कंपनीने आपल्या फोनमध्ये अनेक बदल केले आहेत. काही दिवसांपुर्वीच कंपनीने आपले नवीन आयफोन सीरिज 11 लाँच केली आहे. या फोनमध्ये देखील कंपनीने अनेक शानदार फीचर्स दिले आहेत. मात्र एक फीचर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना आवडलेले दिसत नाही. सध्याच्या आयफोनमध्ये होम बटन देण्यात आलेले नाही, हीच गोष्ट ट्रम्प यांना आवडली नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले की, होम बटन हे सध्या देण्यात आलेल्या फीचर पेक्षा अधिक चांगले आहे.

असे असले तरी, कंपनी आयफोन एक्स सीरिजपासूनच फोनमधील होम बटन काढून टाकलेले आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच नवीन फोन घेतल्याचे दिसत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‍ॅपलचे सीईओ टीम कूक यांचा उल्लेख करत ट्विट केले असले तरी देखील कूक यांच्याकडून अद्याप उत्तर आलेले नाही.

ट्रम्प हे आयफोनच्या फीचर्सवर नाराज झाल्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधी देखील त्यांनी आयफोनमध्ये मोठी स्क्रीन आणण्याचा सल्ला दिला होता.

Leave a Comment