खिळ्यावर झोपून 9 थर रचत विश्वविक्रमाला गवसणी

गुजरातमधील सुरत येथे मार्शल आर्ट्स टीम डेअरडेव्हिल्सने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या टीममध्ये 9 आर्टिस्ट सहभागी होती. प्रत्येक आर्टिस्टने आपल्यावरती खिळे ठेवले होते व त्यांनी त्या खिळ्यांवर एकमेंकांवरती झोपत 9 थर लावले. यावेळी आजुबाजूला उपस्थित प्रेक्षक देखील त्यांचा उत्साह वाढवत आहे.

प्रत्येक कलाकारामध्ये 6-6 इंचचे अंतर होते. हे कलाकार 1 मिनिटांपर्यंत खिळ्यांवर झोपलेले होते. या विक्रमाबरोबरत या टीमने आपलाच जुना विक्रम मोडीत काढला. या टीमने मागील वर्षी देखील हा विक्रम केला होता. मात्र त्यावेळी केवळ 8 आठच सदस्य यात सहभागी झाले होते.

 

Leave a Comment