तब्बल 67 हजारांची नाणी देऊन पठ्ठ्याने खरेदी केली गाडी

मोठी रक्कम द्यायची असेल तर लोक डेबिट-क्रेडिट कार्ड किंवा चेकचा वापर करतात. मात्र मध्यप्रदेशच्या एका पठ्ठ्याने होंडा एक्टिवा खरेदी करण्यासाठी संपुर्ण रक्कम नाण्यांद्वारे केली आहे. गाडीची किंमत 67,490 रूपये असून, या व्यक्तीने संपुर्ण रक्कमेची नाणीच दिली. ही नाणी मोजण्यासाठी शोरूमच्या कर्मचाऱ्यांना तब्बल तीन तास लागले. ही नाणी मोजताना कर्मचाऱ्यांना देखील घाम फुटला.

(Source)

मध्य प्रदेशच्या सतना येथे राहणारे राकेश यांना होंडा एक्टिवा ही स्कूटर खरेदी करायची होती. यासाठी ते नाण्यांनी भरलेली बॅग घेऊन थेट गाडीच्या शोरूममध्ये पोहचले.

 

राकेश यांनी Activa 125BSVI खरेदी करण्याचा निर्णय घेतला व गाडीची किंमत 67,490 रूपये त्यांनी चेक अथवा कार्डाद्वारे न देता थेट नाण्यांनी पेमेंट केले.

नाणी देऊन एखादी वस्तू खरेदी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील एका मुलाने आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त आईला फ्रीज गिफ्ट करण्यासाठी 14 हजार रूपयांचे पेमेंट नाण्यांद्वारे केले होते.

Leave a Comment