ड्युरेक्सच्या दिवाळी जाहिरातीवर नेटकऱ्यांची आगपाखड


कोणत्याही वस्तूच्या मार्केटिंगसाठी आजकाल जाहिरात म्हणजे जादुई कांडी म्हणून सिद्ध होताना दिसून येते. किंबहुना प्रत्येक सणाला किंवा खास दिनाच्या निमित्ताने प्रत्येक उत्पादन कंपन्या आपल्या वेगळ्या ढंगात जाहिरात करताना दिसून येतो. पण असाच काही प्रकार करणे कसे आपल्याच अंगावर कसे उलटते याचे उदाहरण ड्युरेक्स कंडोमच्या जाहिरातीमधून समोर आले आहे. दिवाळीचा मूड सध्या भारतात असल्याने आपल्या विनोदी शैलीत ड्युरेक्सने देखील एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. पण ही जाहिरात शेअर करताच यातून अनेकांनी धार्मिक मानहानी केल्याचा दावा ठोकायला सुरुवात केली. अनेकांनी तर ही जाहिरीत म्हणजे हिंदू धर्मियांचा आणि सणांचा अपमान असल्याचे म्हणत ड्युरेक्सच्या जाहिरातीला सोशल मीडियावरून रिपोर्ट सुद्धा केले.


दिवाळी विशेष जाहिरातीच्या रूपात ड्युरेक्स कंपनी कडून एका बॉटल मध्ये दोन रॉकेट दाखवत असे कॅप्शन देण्यात आले होते. वास्तविक यातून उपहास साधत विनोद करण्याचा हेतू असला तरी अशा प्रकारे एकाच धर्माचा भावना दुखावत टार्गेट करणे हे गैर असल्याची उलट प्रतिक्रिया ड्युरेक्सला मिळाली. दरम्यान, ड्युरेक्सने अनेक सामाजिक मुद्द्यांवर याआधी सुद्धा अशाच जाहिराती बनवल्या आहेत. मग ते ट्राफिक नियमांचे पालन करण्याचा संदेश असो वा सेक्सचा सल्ला या जाहिरातींना लोकांनी देखील चांगली प्रतिक्रिया दिली होती. पण यावेळेस मात्र असे करणे ड्युरेक्सच्या अंगाशी आल्याचे चिन्ह दिसत आहे.

Leave a Comment